Press "Enter" to skip to content

जिल्हापरिषदमध्ये चर्चेला उधाण

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात जिल्हा शिक्षण अधिकारी अनुपस्थित

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रायगड जिल्हा परिषदेच्या स्वागत कक्षात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण विभागामार्फत करण्यात येऊनसुद्धा शिक्षण अधिकारी ज्योत्स्ना पवार शिंदे ह्या अनुपस्थित असल्याने चर्चेला जिल्हापरिषद मध्ये उधाण आले.

१८ व्या शतकात महाराष्ट्रात महिला शिक्षण आणि समाजसुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची सोमवार दिनांक 3 जानेवारी 2022रोजी जयंती होती.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन रायगड जिल्हा परिषदेच्या स्वागत कक्षात करणयात आले होते.

रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या हस्ते प्रथम जिल्हापरिषद मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. तद्नंतर रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी काही काळ शिक्षण अधिकारी ज्योत्स्ना पवार शिंदे यांची प्रतीक्षा केली.मात्र त्यांच्या कार्यालयातील एका महिला कर्मचारी यांनी सांगितले की मॅडम निघाले आहे लवकरच येतील म्हणून प्रतीक्षा केली मात्र त्या काही आल्या नाही.नाईलाजाने उपस्थित जिल्हापरिषदेचे कर्मचारी यांचा खोळंबा होऊ नये म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.

यावेळी महिला व बाळ कल्याण विभागाचे नीती मंडलिक सहित शिक्षण, बांधकाम विभागातील काही कर्मचारी उपस्थित होते.मात्र ज्या विभागाचा कार्यक्रम आहे त्याच विभागाचे प्रमुख कार्यक्रमासाठी अनुपस्थित राहिल्या.हीच मोठी शोकांतिका आहे.तसेच त्यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांचेपण आगमन झाले मात्र त्यांनी सुद्धा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन न करता निघून आपल्या दालनात गेले.
याबाबत उलटसुलट चर्चा ही जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये होती.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.