सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या, महिलांना स्वावलंबनाचा महामंत्र देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त कर्जत नगरपरिषदेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, पाणी पुरवठा सभापती राहुल डाळींबकर, नगरसेवक बळवंत घुमरे, आदींसह नगरपरिषद प्रशासकिय अधिकारी उमेश राऊत, कनिष्ठ अभियंता सारिका कुंभार, रविंद्र लाड, अरविंद नातू,कल्याणी लोखंडे, रुषिता शिंदे,अविनाश पवार,हृदयनाथ गायकवाड,बापू बहिरम,शेखर लोहकरे आदी कर्मचारी उपस्थित होते.








Be First to Comment