मोहोपाड्यात रसायनी युथ महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रसायनी युथ फेस्टिवल व रसायनी कला,क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोपाडा येथील जनता विद्यालयाच्या मैदानावर विविध कला,क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवात विविध कार्यक्रमांची मेजवानी रसायनी तील नागरिकांना अनुभवायला मिळाली.
मोहोपाडा जनता विद्यालय शाळेच्या मैदानावर सालाबादप्रमाणे रसायनी युथ फेस्टिवल सन 2021 ला निरोप देण्यासाठी तसेच सन2022 च्या स्वागतासाठी मोठ्या उत्साहात पार पडला.या महोत्सवात लावणी नृत्य,शरीर सौष्ठव स्पर्धा, महाराष्ट्रातील लोकधारा यात मंगळागौर,नाच ग घुमा, नृत्य स्पर्धा, हळदी कुंकू, पैठणीचा खेळ, हिंदी गाण्यांची धमाल,मिस अॅड मिस्टर रसायनी फॅशन शो आदी कार्यक्रम पार पडले.

या महोत्सवात आकाश उंच पालणे,खाली- वर झुकणारे पाळणे,तिरके पाळणे ,आगीनगाडी आदींची नागरिकांनी बसून मजा घेतली.या महोत्सवात लहानग्यांनीही आनंद लुटला.








Be First to Comment