Press "Enter" to skip to content

रवींद्र मिर्लेकर यांची माथेरानला भेट

माथेरान मधील पक्षाची कार्यपद्धती खूपच समाधानकारक — रवींद्र मिर्लेकर

सिटी बेल | मुकुंद रांजाणे | माथेरान |

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या सुंदर परंतु दुर्गम भागात अनेक लोकाभिमुख कामे पूर्ण करण्यासाठी ज्या सचोटीने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू केले आहेत त्याचबरोबर लोकांची सुध्दा शिवसेनेकडे दिवसेंदिवस वाढता कल तसेच माथेरान मधील पक्षाची कार्यपद्धती,लोकांमधील पक्षाबाबतची सकारात्मकता पाहून खरोखरच समाधान होत आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र शिवसेना समन्वयक रवींद्र मिर्लेकर यांनी व्यक्त केले नववर्षाच्या सुट्टीनिमित्ताने त्यांनी दोन दिवस सहकुटुंब माथेरानला सदिच्छा भेट दिली.

यावेळी त्यांचा शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी जेष्ठ शिवसैनिक तथा उत्तम मार्गदर्शक सुभाष म्हसकर, संयुक्त वन समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र कदम, दिलीप सकपाळ, विजय गंगाराम कदम, सिताराम शिंदे आदी उपस्थित होते. माथेरान मध्ये कधीच होऊ शकली नाही एवढी विकास कामे शिवसेनेच्या कमी कालावधीत पूर्ण झाली आहेत त्याचप्रमाणें पक्षवाढी आणि पक्षाच्या आगामी ध्येय धोरणाबाबतीत पक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या गावासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्यामुळे हे सहज शक्य झाले त्यामुळेच एवढी मोठी कामे मार्गी लागली आहेत अजूनही प्रस्ताव सादर केले असून २०२४ पर्यंत जवळपास संपूर्ण कामे पूर्णत्वास जाणार असल्याचे प्रसाद सावंत यांनी स्पष्ट केले.शिवसेना हा तळागाळापर्यंत पोहोचलेला एकमेव पक्ष आहे आणि इथली एकंदरीत भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता आमच्या परीने नक्कीच सहकार्य राहील असे मिर्लेकर यांनी शेवटी नमूद केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.