Press "Enter" to skip to content

श्री जोगेश्वरी माता मंदिरा समोरील दीपस्तंभावरील दीप पेटवून सलामी

नागोठण्यात हुतात्मा विरभाई कोतवाल व हिराजी पाटील यांची पुण्यतिथी देशभक्तीमय वातावरणात साजरा

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

नागोठणे येथील नाभिक समाज बांधवांकडून हुतात्मा विरभाई कोतवाल व हिराजी पाटील यांची ७८ वी पुण्यतिथी भारताच्या स्वतंत्रेचा अमृतमोहत्सवी वर्षानिमित्त अत्यंत देशभक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली .

२ जानेवारी हा दिवस हुतात्मा विरभाई कोतवाल व हिराजी पाटील यांचा हुतात्मा दिन म्हणून नाभिक समाज बांधव देशभक्तीमय वातावरणात साजरा करत असतात. या वर्षी भारताच्या स्वतंत्रेचा अमृतमोहत्सवी वर्ष असल्यामुळे हा हुतात्मा दिन साजरा करताना नाभिक समज बांधवांमध्ये प्रचंड प्रमाणात उत्साह संचारलेला दिसून येत होता.

नागोठणे येथील नाभिक समाज बांधव सकाळी ५.४५ वाजता रायगड जिल्हा नाभिक समाज संघांचे विश्वस्त भाई टके यांच्या निवासस्थानी एकवटले. त्यानंतर मशाल पेटवून हुतात्मा विरभाई कोतवाल, हिराजी पाटील अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा देत नागोठणे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता प्रांगणात जमा झाले व सकाळी ६.१० वाजता श्री जोगेश्वरी माता मंदिरा समोरील दीपस्तंभावरील दीप पेटवून सलामी दिली व हुतात्मा विरभाई कोतवाल व हिराजी पाटील यांना वंदन केले.

यावेळी भाई टके, उदंड रावकर, विवेक रावकर, रवि टके, सुधाकर निंबाळकर, जगदीश दिवेकर, संतोष माने, सुधाकर टके, मिलिंद गुजर, मनोज गायकवाड, राजू माने, दिपक पवार, संदीप कडू, अभिषेक गुजर आदींसह नाभिक समाज बांधव उपस्थित होते. दरम्यान नागोठणे ग्रामपंचायत व नाभिक समाज बांधवांच्या वतीने हुतात्मा विरभाई कोतवाल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. यावेळी उपसरपंच मोहन नागोठणेकर, बापू रावकर, सुरेश गायकवाड, शैलेश रावकर, अॅड. श्रीकांत रावकर, सत्यजित रावकर आदींसह नाभिक समाज बांधव व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.