Press "Enter" to skip to content

वडगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत विकासकामे

तळवलीत अंडरग्राऊंड गटार बांधकामांचे भुमिपुजन

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील महत्त्वाची समजली जाणारी वडगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत विकास कामे करण्याकडे सरपंच गौरी महादेव गडगे यांचा अधिक कल असल्याचे दिसून येते. निवडून आल्यानंतर परिसरात प्रलंबित विकासकामे करण्याकडे सरपंच गौरी गडगे यांनी लक्ष घालून गेल्या अडीच वर्षांत परिसराचा कायापालट करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.नुकताच ग्रामपंचायत हद्दीतील तळवली दांडवाडी येथील आदीवासी बांधवांना पाण्याचा त्रास होऊ नये यासाठी काही बांधवांना वैयक्तिक नळ कनेक्शन दिले.तर तळवली ग्रामस्थांसमोर असणा-या समस्या सोडविण्यासाठी सरपंच गौरी महादेव गडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील विभाग सदस्य प्रयत्न करताना दिसत आहेत.

दरम्यान नववर्षाच्या पहिल्या दिवशीच तळवली गावातील बाळाराम मालकर यांच्या घरापासून ते विठ्ठल मंदिर पर्यंत अंडरग्राऊंड गटार बांधणे या कामाचे भूमिपूजन सरपंच गौरी महादेव गडगे यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत सदस्या कल्पना मदन ठोंबरे,सदय्य सरिता संतोष गडगे, सदस्य संदिप पाटील, सदस्या राजेश पाटील,सदस्य शिवाजी शिंदे, संतोष गडगे, संतोष पाटील, सदस्य संदेश जगन्नाथ मालकर आदिसह मधूकर मालकर, जगन्नाथ मालकर, लक्ष्मण मालकर, तुकाराम मालकर, देविदास मालकर,अतुल मालकर, शिवनेरी ग्रुप तळवली व महिला मंडळ तळवली उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.