सिटी बेल | पनवेल | संजय कदम |
पनवेल शहरातील मच्छि मार्केट परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
सदर इसमाचे अंदाजे वय 50 ते 55 वर्षे, डोक्याचे व दाढीचे केस काळे पांढरे असून त्याच्या अंगात पांढर्या शर्ट व पॅन्ट आहे. तसेच डाव्या हातावर त्रिशुळचे चिन्ह व उजव्या हातावर ओम त्या खाली काही अक्षरे गोंदलेली आहेत. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा सहा.पो.निरीक्षक श्रीकांत शेडगे यांच्याशी संपर्क साधावा.







Be First to Comment