Press "Enter" to skip to content

५० जणांना ब्लँकेटचे वाटप

विद्यार्थी उन्नती संघाने आदिवासी बांधवांना दिली मायेची उब

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

नागोठण्यातील कुंभारआळी येथे कार्यरत असलेली विद्यार्थी उन्नती संघ ही संस्था आणि प्रज्योती पुस्तक पेढी, जोगेश्वरी(मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने नागोठण्याजवळील चिकणी(ता.रोहा) येथील आदिवासी वाडीवरील ५० आदिवासी बांधवाना उबदार ब्लॅंकेट्सचे वाटप नुकतेच करण्यात आले. अशाप्रकारे नागोठण्यातील विद्यार्थी उन्नती संघ व प्रज्योती पुस्तक पेढीने आदिवासी बांधवांना ऐन थंडीच्या मौसमात ब्लँकेटचे वाटप करुन मायेची उब दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

विद्यार्थी उन्नती संघ, नागोठणे (कुंभारआळी) आणि प्रज्योती पुस्तक पेढी जोगेश्वरी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रज्योती पुस्तक पेढीचे संचालक राजेश सावंत आणि विद्यार्थी उन्नती संघ नागोठणेचे विद्यमान अध्यक्ष दीपक वाडेकर, कार्याध्यक्ष आनंद धाटावकर, सहसचिव सचिन वासकर, माजी अध्यक्ष कांचन वाडेकर आणि माजी सचिव मिलिंद धाटावकर व सदस्य शैलेश नागोठणेकर यांच्या शुभहस्ते चिकणी आदिवासी वाडीतील ५० आदिवासी बांधवांना या उबदार ब्लॅंकेटसचे वाटप करण्यात आले. त्यावेळी चिकणी येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण देवरे हे देखील उपस्थित राहिले.

सध्या ऐन कडाक्याच्या थंडीच्या मोसमात आदिवासी बांधवांची अडचण ओळखून विद्यार्थी उन्नती संघातर्फे वाटप करण्यात आलेल्या या आवश्यक आणि अनमोल मदतीबद्दल सर्व आदिवासी बांधव व चिकणी येथील ग्रामस्थ यांनी खूप समाधान व्यक्त केले आणि विद्यार्थी उन्नती संघ व प्रज्योती पुस्तक पेढीच्या सर्व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.