Press "Enter" to skip to content

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या पाठपुराव्याला यश

दास्तान फाटा ते चिरले या रस्त्याला पडलेले खड्डे बुजविण्यात सुरवात

उरण(घन:श्याम कडू) उरण मतदारसंघाचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता भोये यांना भेटून दास्तान फाटा ते चिरले रस्त्यावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे सदर रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. मोठ्या खड्डयामध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे त्या रस्त्यावरून दिघोड, वेश्वी परिसरातील सीएफचे कंटेनर या रस्त्यावरून रात्रंनदिवस ये जा करत असतात. तसेच खड्यामध्ये पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना खड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे चिरले गावाशेजारी एक कंटेनर टेलर कलंडला होता.
परिस्थितीची माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी पहाणी केल्यानंतर त्यांनी त्वरित सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपभियंत्याला भेटून या रस्त्यातील खड्डे भरण्यास सांगितले. उपभियंता श्री.भोये यांनी ते खड्डे तात्काळ भरून घेतले. त्यामुळे चिरले गावातील सर्व ग्रामस्थांना त्या रस्त्यावर एखादा कंटेनर पलटी होऊन मोठा अपघात होण्याची भीती ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाली होती ती दूर झाली. रस्त्याचे काम झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचे आभार व्यक्त केले.
उरण परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या ज्या ज्या रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत. ते सर्व तात्काळ बुजविण्यात यावे असे आदेश माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी दिले आहेेेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.