Press "Enter" to skip to content

धामणसई गावचा सीतारा राष्ट्रीय पातळीवर चमकला

रोह्याच्या अक्षय निकमची भारतीय दिव्यांग कबड्डी संघात निवड

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

कर्तुत्वाला आणि धेय्याला मेहनतीची जोड लाभली की यश हमखास गवसतेच. अंगभूत गुणांच्या जोरावर शारीरीक व्यंगालाही आपली ताकद बनवून धामणसई गावचा सीतारा राष्ट्रीय पातळीवर चमकला..

कठोर परीश्रमाने आणि चिकाटीने केलेल्या मेहनतीच्या जोरावर रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धामणसई या छोट्याशा खेड्यात जन्माला आलेला कु.अक्षय दत्ता निकम याची दिव्यांग प्यारा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड झाली.. अजमेर राजस्थान येथे झालेल्या या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघ उपविजेता ठरला… आपल्या बहारदार खेळाने अक्षयने उपस्थितांची मने जिंकली.

गावच्या मातीतील कबड्डीला राज्य पातळीवर तसेच देश पातळीवर घेऊन जाण्याची किमया साधली ती धामणसई गावच्या या सुपुञाने. आणि रोहा तालुक्यातील कबड्डीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.. आज कबड्डीच्या खेळात राष्ट्रीय पातळीवर रोह्याचे नाव मानने घेतले जाते.

धामणसई गावच्या या सुपुत्राच्या खेळाने सगळेच प्रभावित झाले.. त्याच्या उत्कृष्ट खेळाने निवड समितीचेही लक्ष वेधून घेतले आणि अक्षयची निवड भारतीय संघात झाली.. आज ग्रामीण भागात गावपातळीवर खेळणाऱ्या, सर्वसामान्य कुटुंबातील एका दर्जेदार कबड्डीपट्टूला देशपातळीवर खेळताना पहाण्याचे भाग्य रोहेकरानां लाभणार असल्याने सर्वत्रच अक्षयच कौतून होत आहे.

नुकतेच अक्षयचे आगमन रोहे शहरात झाले आणि धामणसई ग्रामस्थांनी तसेच तालुक्यातील कबड्डी प्रेमींनी अक्षयचे स्वागत जल्लोशात केले.. गावातील तरूणांनी खुप साऱ्या शुभेच्छा तथा अभिनंदन करण्यासाठी अक्षयची भेट घेतली व ढोळ ताशांच्या गजरात अक्षयचे मिरवणूक गावातून काढली तसेच तालुक्यातील मान्यवरांनीही अक्षयची पाट थोपटून कौतुकाचा अभिनंदनाचा वर्षाव करत त्याला पुढील वाटचालीस अधिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

More from क्रिडाविश्वMore posts in क्रिडाविश्व »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.