Press "Enter" to skip to content

खालापूर तालुका कृषी अधिकाऱ्यांचा पुढाकार

शेतकरी बांधवांसाठी सातारा येथे प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

तालुक्यातील शेतकरी शेती करीत असतांना त्यांनी पारंपरिक शेती करीत आहे.मात्र आधुनिकतेची कास धरल्यास शेती उत्तम प्रकारे होवू शकते.शेतीमध्ये कोणते बदल घडविले पाहिजे त्याच बरोबर बदलत्या ऋतू प्रमाणे कोणती पिके घ्यावी असे विविध प्रकारचे मार्गदर्शन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत पुणे,सातारा येथे भरविण्यात येणार असल्याचे समजते.

खालापूर,कर्जत,पनवेल,उरण अदि तालुक्यातील शेतकरी वर्गांनी प्रशिक्षण शिबीरांस येण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ,उप विभागीय कृषी अधिकारी खोपोली बालाजी ताटे,यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.ज्या शेतकरी बांधवांना या प्रशिक्षण शिबीरांस येण्यासाठी एक आठवड्या मध्ये खोपोली रामेती येथे तालुका कृषी अधिकारी यांच्या कडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सदर हे प्रशिक्षण शिबीर पाच दिवसांसाठी असून या माध्यमातून शेतकरी वर्गांस मोठा फायदा होणार आहे.सुधारित बियाने ,विविध झाडे, फळे पाळे भाज्या यांच्यावरती होणारे आजार आणी उपायोजना अदि सर्व बाबीचा अभ्यास या माध्यमातून शेतकरी वर्गांस करावयास मिळणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.