Press "Enter" to skip to content

नागोठणे मध्ये विनामास्क मोकाट फिरणाऱ्यांवर कारवाई

सिटी बेल | याकूब सय्यद | नागोठणे |

नागोठणे मध्ये विनामस्क फिरणाऱ्या लोकांवर महसुल विभाग,पोलीस विभाग व ग्रामपंचायत अशी संयुक्त कारवाही करण्यात आली.

राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे नियम पाळण्यापासून ते कॉन्टॅक्ट ट्रेसिंगपर्यंतच्या अनेक उपाययोजनांची अमलबजावणी करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर अनेक जिल्ह्यात संचारबंदी, जमावबंदीचे आदेश देण्यात आले असून काही ठिकाणी हॉटेल्स, पब, रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालयांना नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर नागोठणे मध्ये तिन्ही विभागाची मिळून संयुक्त विना मास्क कारवाई मोहीम राबविण्यात आली या मध्ये मास्क न लावता किंवा अयोग्य रीतीने लावून फिरणाऱ्या नागरिकांना मास्कची आवश्यकता देखील समजावून सांगितली आहे. मास्क नसल्यास मास्क वापराच्या मूळ उद्दिष्टांची पूर्तता व्हावी, यासाठी दंड करण्यात आला या कारवाही मध्ये रोहा तहसिलदार कविता जाधव,नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर, पोलीस उपनिरीक्षक सचिन सावंत लोहा पंचायत समिती गटविकास अधिकारी अनिकेत पाटील नागोठणे ग्रामपंचायतचे ग्रामविस्तार अधिकार मोहन दिवकर पोलीस कॉन्स्टेबल गंगाराम डुमना आदींचा समावेश होता.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.