Press "Enter" to skip to content

खालापूर तालुक्यातील आंबिवली गावातील प्रकार

पोषण आहारात आढळले किडे आणि आळ्या : महिलावर्गामध्ये संताप

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

लहान मुले कुपोषित राहू नये त्यासाठी त्यांस पोषण आहार देण्यात येत असतो. शासनांने पोषण आहारामुळे मुलांच्या मध्ये चांगली वाढ व्हावी या दृष्टीकोणातून आहार गेल्या काही वर्षापासून सुर आहे.मात्र खालापूर तालुक्यातील असलेल्या आंबिवली गावातील महिला वर्ग पोषण आहार घरी घेवून आल्यानंतर ते पॉकीट फोडल्यानंतर त्या कडधान्यामध्ये किडे असल्याचे निदर्शनास आल्यामुळे महिला वर्गामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

मुलांसाठी येत असलेल्या पोषण आहार हे पॅकीट मध्ये सील बंद स्वरूपात असल्यामुळे कुणालाही ते चांगल्या स्थितीत आहे.यांची जाणीव नसते. काही वेळा तसेच ठेवल्या नंतर हे खराब झाले की असे प्रश्न निर्माण होते.मात्र आलेले पोषण आहार मुलातच निकृष्ट दर्जाचे आल्यामुळे महिलावर्गामध्ये नारजीचा सुर उमठत आहे.

सदर पोषण आहारांची तपासणी करुणच पुढील गावामध्ये असलेल्या मुलांसाठी देण्यात यावे असे तिथे जमलेल्या महिला वर्गांनी प्रतिनिधी शि बोलतांना सांगितले.

लहान मुलांचा पोषण आहार हा फुड क्रॉरपोरेशन इंडीया यांच्या माध्यमातून डायरेक्ट असतो.सदर काही पोषण आहारामध्ये कोडे किंवा आळ्या असतील तर ते बदलून नविन देण्यात येइल – बाल विकास प्रकल्प अधिकारी, चेतन गायकवाड

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.