विनामास्क फिरणाऱ्यावर कर्जत नगरपरिषदेची दंडात्मक कारवाई
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अजून संपला नाही. कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या आता पुन्हा वाढू लागली आहे. त्यात ओमीक्रॉंन व्हेरीयंट चा प्रादुर्भाव वाढत आहे, आरोग्य विभाग आणि प्रशासनाकडून नागरीकांना मास्कचा वापर करा. सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. तरी नागरिक बाजार पेठेत विना मास्क फिरत आहेत अश्यावर कर्जत नगरपरिषद दंडात्मक कारवाई करत आहे.

कर्जत हे तालुक्याचे ठिकाण आहे त्यामुळे कर्जत शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे, कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासनाने आता नवीन निर्बध लावले आहेत, या पार्श्वभूमीवर कर्जत नगरपरिषद विना मास्क फिरणाऱ्यावर काल दि.30 डिसेंबर आणि आज 31 डिसेंबर रोजी 42 जणांवर प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई 21 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

कर्जत बाजारपेठेत मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात तीन पथक बनविण्यात आली आहेत, ही पथके विनामास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करीत आहेत, शासनाने नियम ठरवून दिले आहेत त्याचे पालन करा असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी केले आहे.








Be First to Comment