Press "Enter" to skip to content

जयदास पाटील यांची पंचायत समिती संपर्क प्रमुखपदी निवड

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख दत्ताजी दळवी यांच्या मार्गदर्शनानुसार सावळे देवळोली येथील जयदास पाटील यांची शिवसेना पक्षाच्या पोयंजे पंचायत समिती संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.याबाबत जयदास पाटील यांना माजी आमदार मनोहर भोईर यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

शिवसेना पक्षाच्या ध्येय – धोरणांना अनुसरून वाटचाल करून शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी , पक्ष बांधणीसाठी आणि विस्तारासाठी जयदास पाटील प्रयत्नशील असल्याने त्यांना सदर जबाबदारी सोपविण्यात आल्याचे समजते.

देवळोली येथील माजी सरपंच जयदास पाटील हे गावच्या तंटामुक्तचेही अध्यक्ष असून गावच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात.त्यांच्यावर पोयंजे पंचायत समिती संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने जयदास पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.