जुलै अखेर वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीत एकूण 270 कोरोनाबाधित तर 155 कोरोनामुक्त
सिटी बेल लाइव्ह / रसायनी-राकेश खराडे
कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळित केले आहे. कोरोना संसर्गं कधी, कुठे, कसं, कुणाला, कशाप्रकारे गाठुन वेठीस धरेल हे कुठलाही ज्योतीषी वा तज्ञही सांगु न शकणारी सत्य आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
रसायनी परीसरातील वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीत कोरोनाने आपली दहशत निर्माण केली आहे. यातच परीसरातील इतर भागापेक्षा कोरोनाचे रुग्ण वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत वाढतच असल्याने चिंतेची बाब असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जवळपास 60 टक्के आहे.वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागातील कोरोनाग्रस्तांची जुलै अखेर आकडेवारी
चांभार्ली ग्रामपंचायत हद्दीत एकूण 23 कोरोनाग्रस्त,बरे झालेले 11,मयत 1,उपचार 11
लोधिवली ग्रामपंचायत हद्दीत एकूण 37 कोरोनाबाधित ,बरे झालेले 13, उपचार सुरू असलेले 24
वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत एकूण 210, एकूण बरे 130,मयत 3, उपचार सुरू असलेले 77
रसायनी परीसरातील मोहोपाडा बाजारपेठेत आसपासच्या परिसरातील नागरिक खरेदीसाठी येत असल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी होवून सोशल डिस्टसिंगचे तीनतेरा वाजल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत कोरोनासंसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन होत आहे.






Be First to Comment