Press "Enter" to skip to content

ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांचा सागरगड येथे सत्कार

सिटी बेल | सागरगड |

माची येथील आदिवासी वाडीच्या रस्त्यासाठी रायगड जिल्हा नियोजन समितीने २०१२ साली ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. पण सदर निधी या रस्त्यासाठी खर्ची न पडल्यामुळे ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेउन निवेदन दिले. म्हणून राज्यपाल यांनी जिल्हाधिकारी यांना आदेश दिल्यामुळे सदर रस्त्यासाठी २० लाख रुपयांचा तात्पुरता निधी मंजूर केला. त्यामुळे श्री दत्त संस्थान माची – सागरगडतर्फे संस्थानचे सर्वेसर्वा डाॕ. डी. सी. शिवकर व किसन पवार यांच्या हस्ते वालेकर यांचा सत्कार करण्यात आला.

त्यावेळी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स. चे नि. अभियंता विजय रानडे ,पत्रकार अशोक म्हात्रे , पोलिस पाटील बाळक्रुष्ण पाटील , संदीप पाटील , मोहन पाटील , मनोज कोदेरे , अनंत रामचंद्र नाईक , सौ. अनिता अनंत नाईक इ. उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.