पतीनेच खून करून मृतदेह जंगलात टाकला
सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)
दोन दिवसापूर्वी महिलेचा मृतदेह प्लास्टिक पिंपात मिळ ठाकूरवाडी जंगलात सापङल्याने खालापूरात खळबळ माजली होती.परंतु या घटनेत रबाले नवी मुंबई पोलीस तपास करित खालापूरात पोहचल्याने गूढ वाढले होते.अखेर या खून प्रकरणावरचा पङदा उठला असून चारिञ्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीची गळा आवळून हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
अंबुज तिवारी याने पत्नी नीलम हिचा चारिञ्याच्या संशयावरून खून केला .हा खून त्याने घणसोलीत राहणारा त्याचा मिञ श्रीकांत चौबे याच्या फ्लॅटवर 23जुलैला केला होता.त्यानंतर छोट्या टेम्पोतून मृतदेह प्लास्टिक पिंपात भरून खालापूर तालुक्यात मिळ ठाकूरवाङी नजीक जंगलात साधारणपणे 15 ते 20 फूट खोल टाकला होता.नीलम हरविल्याची तक्रार रबाले पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर रबाले पोलीसांच्या तपासात खूनाचा उलगङा झाला.नीलमचा पती अंबुज तिवारी आणि त्याचा मिञ श्रीकांत चौबे सध्या रबाले पोलीसांच्या कोठङीत आहेत.






Be First to Comment