Press "Enter" to skip to content

राष्ट्रीय दिव्यांग पॅरा कब्बडी स्पर्धेत मुंबई राॅक्स

पुष्कर राजस्थान येथील राष्ट्रीय दिव्यांग पॅरा कब्बडी स्पर्धेत महाराष्ट्र आणि मुंबई संघ कब्बडी संघ उपांत्य फेरीत

सिटी बेल | पुष्कर | अमूलकुमार जैन |

पुष्कर,राज्यस्थान येथे चालू असणाऱ्या राष्ट्रीय दिव्यांग पॅरा कब्बडी स्पर्धेत महाराष्ट्र व मुंबई पॅरा कब्बडी संघाने चांगली कामगिरी करत आपले स्थान प्रस्थापित करून आज उपांत्य फेरीत सहभागी झाले आहेत. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जनार्दसिंह गहलोत याच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रीय पॅरा कब्बडी स्पर्धेत महाराष्ट्राने अ गटात झारखंड, बिहार, मुंबई व उत्तर प्रदेश या संघाना हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला तर मुंबई संघाने झारखंड, बिहार व उत्तर प्रदेश या संघाना हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

महाराष्ट्र संघाकडून रायगड जिल्ह्यातील राजेश मोकल, अक्षय निकम,ओमकार महाडिक व कर्णधार रमेश संकपाळ, मुकुल खाडे नंदुरबार जिल्ह्यातील महेश वसावे, सांगली जिल्ह्यातील आरिफ शेख आणि मुंबई संघाकडून नंदुरबार जिल्ह्यातील रायसिंग वसावे, सांगली जिल्ह्यातील ज्योतिराम कदम रायगड जिल्ह्यातील कर्णधार मंगेश म्हात्रे,गणेश पाटील यांनी चांगली कामगिरी केली असे कुलाबा दिव्यांग क्रिडा असोसिएशन महाराष्ट्र व सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था रोहा रायगडचे सचिव व दोन्ही संघाचे व्यवस्थापक शिवाजी पाटील व सहव्यवस्थापक संकल्प अपंग संस्थेचे सचिव बाबाराव धोत्रे यांनी माहिती दिली

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.