Press "Enter" to skip to content

मुरूड ला जातायं ? मग ही बातमी वाचा !

साळाव चेकपोस्ट पाशी पर्यटकांची कसून तपासणी : दोन डोस, मास्क सक्तीचे

सिटी बेल | रेवदंडा | अमूलकुमार जैन |

सरत्या वर्षाला निरोप नववर्षाच्या स्वागताकरता सर्वत्र लगभग आहे.त्यातच मुंबई सह विविध शहरातून पर्यटकांनची कोकणाला पहिली पसंती असते रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड येथील पर्यटन स्थळ सध्या गजबजलेली आहेत त्यात वर्षा अखेर च्या दिवशी तर अधिकच पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहणार आहे, आत्ता पासून अनेक जण अलिबाग, मुरुड तालुक्याकडे येत आहेत.

परंतु नव्याने आलेल्या ओमायक्रोनचा धोका लक्षात घेता अलिबाग मुरुड ह्याना जोडणारा साळाव येथील चेकपोस्ट पाशी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून पोलिस कर्मचारी तसेच वैद्यकीय कर्मचारी ,प्रशासकीय कर्मचारी चेकपोस्ट पाशी येणाऱ्या पर्यटकांना अडवून वाहन नी वाहन ह्याचा तपास करत असून येणाऱ्या पर्यटकांनचे लसीकरणाचे दोन डोस झाले असतील तरच पुढे सोडले जात आहे .अन्यथा जर डोस पूर्ण झाले नसतील तर त्याची कोरोना संदर्भात चाचणी केली जात आहे.तसेच विनामास्क वर देखील करवाई केली जात आहे. एकंदरीत ओमायक्रोनचा धोका लक्षात प्रशासकीय यंत्रणेने सतर्कता बाळगली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.