Press "Enter" to skip to content

पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करण्याचा संकल्प

कर्जत मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचा १३७ वा स्थापना दिन साजरा

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत तालुका काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा १३७ वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करण्याचा संकल्प सोडला.

आमराई मध्ये काँग्रेस स्थापना दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तालुकाध्यक्ष मुकेश सुर्वे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सुभाष मदन यांनी प्रास्ताविकात काँग्रेस पक्षाची कामाची पद्धती सांगितली. त्यानंतर काँग्रेस पक्ष ध्वजाचे ध्वजारोहण मुकेश सुर्वे यांच्या हस्ते करून सलामी देण्यात आली. माजी शहराध्यक्ष विजय हरिश्चंद्रे यांनी ‘काँग्रेस पक्षाने देशासाठी खूप काही दिले. म्हणूनच स्वातंत्र्यानंतर आपण सक्षम पणे उभे राहू शकलो. काँग्रेस पक्षाची नुसती पदे न घेता पक्ष अधिक बळकट कसा होईल यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत.’ असे सूचित केले.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष धनंजय चाचड, माजी शहराध्यक्ष हेमंत देशमुख, नेरळ शहराध्यक्ष असिफ अत्तार, संदीप पाटील, बळीराम कोळंबे, शिवाजी श्रीखंडे, पांडुरंग देशमुख आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.