स्थानिक भयभीत : रिपब्लिकन सेनेचे मुख्यमंत्र्यांना तक्रारी निवेदन
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने फोफावत असल्याने जिल्ह्याची चिंता दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. अशातच येथील लहान मोठ्या कंपन्या, कारखाने, प्रकल्प व उद्योगधंद्यातून मोठ्या प्रमाणावर कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असल्याचे समोर आले आहे. जिल्यातील विळे -भागाड एमआयडीसी मध्ये काही कंपन्या शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत कोरोना काळात बेफाम सुरू असल्यामुळे या कंपन्या कोरोना संसर्गाचे केंद्र बनल्या आहेत.
सभोवतालच्या नागरिकांत घबराट पसरली असून परिसरातील गावकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याची तक्रार रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात कामगार नेते रमेश जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे दिली आहे. सदर निवेदनाची प्रत माहितीकरिता आरोग्यमंत्री डॉ.राजेश टोपे यांना देखील देण्यात आली आहे.तक्रारी निवेदनात स्पष्ट नमूद केले आहे की
पोस्को महाराष्ट्र स्टील या कंपनीत दि.25/07/2020
दी.26/07/2020 रोजी देखील 15 ते 20 रुग्ण सफाई कामगार व अन्य कर्मचारी असल्याची देखील माहिती मिळत आहे. मा. जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशाने संपूर्ण जिल्हा बंद असताना त्याच काळात मात्र कंपनी राजरोसपणे सुरू असल्याचे कळते. शासनाच्या नियमाने 14 ते 21 दिवस कॉरोंटाइन केले जाते. परंतु कंपनी, माया हॉटेल सदर कामगार कर्मचाऱ्यांना फक्त 7 दिवस किंवा 2 ते 3 दिवस कॉरोंटाइन करून त्यांना कामावर घेत असल्याची गंभीर बाब रिपब्लिकन सेनेने निवेदनात स्पष्ट केली आहे.
सदर कंपनीत अंदाजे 1500 कामगार कर्मचारी आता आहेत. रोज 300 ते 400 लोक कामगार माणगाव, रोहा, महाड, लोणारे,कोलाड, इंदापूर, पेण व खोपोली, निजामपूर सह मुंबई, पुणे आदी कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागातून कामगार येतात. याबाबत स्थानिकांनी सातत्याने तक्रारी येत असून प्रशासन स्थरावर कोणतीही दखल घेतली जात नाही.
या सर्व प्रकरणामुळे कंपनी शेजारची सर्व गावे भयभीत झाली आहेत. कंपनीला वाटते की, अनेक लोक आम्ही मॅनेज करू शकतो. तसे काही पुढारी व त्यांचे नातेवाईक कंपनीत विविध धंदा करीत असल्याचे तक्रारी निवेदनात म्हटले असून याच्याच जोरावर कंपनी स्थानिक कामगारांना दमदाटी करून त्यांचे एक प्रकारे शोषण करीत असल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेने केला आहे. सदर तक्रारी निवेदनाची जलद रीतीने दखल घ्यावी अन्यथा कंपनी विरोधात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.






Be First to Comment