गुटखा किंग गुड्डू ला अटक : कोर्टाच्या अवमान प्रकरणी अलिबाग पोलिसांची कारवाई
सिटी बेल | पेण | वार्ताहर |
पेण येथील गुटखा विक्रेता शहजाद सरवरअल्ली शेख उर्फ गुड्डू याला न्यायालयाच्या अवमान प्रकरणी अलिबाग पोलिसांनी रात्रीच्या सुमारास पेण येथे ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे. जिल्हा न्यायालयाने त्याला अटक वॉरंट जारी केल्यानंतर ही अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील गुटखा किंग म्हणून ओळख असलेल्या पेण येथील गुड्डू याला गुटखा विक्री प्रकरणी सप्टेंबर २०१९ मध्ये अलिबाग पोलिसांनी अटक केली होती.या बाबत अलिबाग येथील जिल्हा न्यायालयात त्याची सुनावणी सुरु आहे.मात्र सदर इसम कोर्टात सुरु असलेल्या सुनावणी ला वारंवार गैरहजर राहिल्यामुळे त्याच्या विरोधात अलिबाग जिल्हासत्र न्यायालयाने अटक वॉरंट काढले असता त्यानुसार सोमवारी (दि.२७) रोजी रात्री अलिबाग पोलिसांनी पेण येथून गुड्डू ला अटक करून अलिबाग येथे नेण्यात आले. या प्रकरणी त्याला मंगळवारी न्यायालया समोर हजर करण्यात आले.








Be First to Comment