शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करा : तहसिलदार विक्रम देशमुख
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करा, नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्या कठोर कारवाई करण्यात येईल असे प्रतिपादन कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी मार्गदर्शन करतांना केले.
कोव्हीड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेबाबाबत कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल मालक व रिसॉर्ट मालक यांची बैठक नेरळ पोलीस ठाण्याच्या सभागृहात आयोजित केली होती, याप्रसंगी तहसीलदार विक्रम देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर उपस्थित होते.
31 डिसेंबर व नववर्षाच्या अनुषंगाने कोरोना विषाणू व नविन विषाणू प्रजाती ओमीक्रॉंन च्या संक्रमणाचा प्रसार रोखण्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती, राज्यातून,जिह्यातून येणारे प्रवाशी, पर्यटक यांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक आहे, तसेच सर्व नागरिकांनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे अश्या सूचना प्रामुख्याने देण्यात आल्या, तसेच कोव्हीड अनुरूप नियमांचे उल्लंघन करण्या-या हॉटेल मालक, रिसॉर्ट मालक व सामान्य नागरिक यांना दंड व शास्ती करण्यात येईल अश्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या.








Be First to Comment