महाडच्या सभापती सिद्धी खांबे यांचा केंद्रशाळा करंजखोलतर्फे सत्कार
सिटी बेल | महाड | प्रतिनिधी |
महाड पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती सिद्धी गणेश खांबे, यांनी आपले प्राथमिक शिक्षण ज्या शाळेत घेतले त्या केंद्रशाळा करंजखोलने त्यांचा सत्कार करण्यात आला.
महाड तालुक्यातील करंजखोल केंद्र शाळा करंजखोल येथे ग्राम पंचायत करंजखोलचे विद्यमान सरपंच अशोक पोटसुरे यांचे शुभहस्ते त्यांच्या सुकन्या सिद्धी खांबे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ रुचिता पोटसुरे व मुख्याध्यापिका दातार व मानसी केतकर यांनी सिद्धी खांबे यांची खणानारळाने ओटी भरून व सौभाग्य वाण देऊन सत्कार करण्यात आला.

सेवा सहयोग फाउंडेशन, पुणे यांचे सहकार्याने मे. ऑल स्क्रिप्ट प्रा.लि. पुणे यांचे सीएसआर उपक्रमातुन केंद्र शाळा करंजखोल येथे डिजिटल क्लासरूम व संगणक लॅब सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमाचा शुभारंभ सभापती सौ सिद्धी खांबे यांच्याहस्ते करण्यात आला.
या प्रसंगी सभापती सिध्दी खांबे यांनी आपले शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला, शाळेला सहकार्य केल्या बद्दल ऑल स्क्रिप्ट कंपनी पुणे व सेवा सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल नागरस, तसेच प्रसाद सिरशिकर जाहीर आभार मानले व या डिजिटल शिक्षणाचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता जपावी असे आवाहन त्यांनी केले.
या समारंभास ग्राम सेवक बंडगर, ग्राम पंचायत सदस्या, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, अंगणवाडी सेविका व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विषय शिक्षिका सौ स्नेहल खातू यांनी ईशस्तवन, सूत्रसंचालन आणि कार्यक्रमाचे आभार मानले.








Be First to Comment