माथेरान मध्ये पर्यंटकांनी तोबा गर्दी
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
मुंबई -पुणे या दोन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले दोन्ही शहरापासून जवळ असेलेले प्रदूषण मुक्त पर्यंटन अशी ओळख असेले माथेरान पर्यटकांनी बहरले आहे.
जोङून आलेली शनिवार रविवार नाताळ सणांची सुट्टी तसेच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी माथेरान मध्ये पर्यंटकांनी तोबा गर्दी केली आहे, मागील दोन वर्षा पासून कोरोना चे संकट राज्यावर होते, त्यामुळे माथेरानच्या पर्यटनावर त्याचा परिणाम झाला होता तर या वर्षी कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्याने माथेरान मध्ये पर्यंटकांची गर्दी झाली आहे.
माथेरान हे कोरोना मुक्त असून येण्या-या पर्यंटकांना कोरोना चा प्रादुर्भाव वाढु नये या करता नगरपालिकेकङून माथेरान मध्ये येणा-या पर्यंटकांचे थरमल सकॅनिंग करून तसेच ऑसिजन लेवल, मास्क परिधान करून तसेच लसीचे दोन ङोस घेतलेल्या पर्यंकांना प्रवेश दिला जातो तर मास्क लावा अन्यथा दंड भरावा लागेल असा फलक नगपालिके मार्फत जागोजागी पहायला मिळतो, माथेरान कोरोना मुक्त रहावे या करता नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे तसेच नगराध्यक्ष प्रेरणा सावंत पर्यंटकांना मास्क लावण्या सुचना करत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये या करता पोलीसांनी देखील हाॅटेल चालकांना सुचना दिल्या आहेत. परवानगी शिवाय कुठलेही वाद्य वाजवता येणार नाही तसेच एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये या करता पोलीस प्रशासन देखील लक्ष ठेवून आहेत.
सुट्टी काळात येणा-या पर्यंटकांची गर्दी लक्षात घेता कूठेही घाटात टॅफीक जाम होऊ नये या करता जुममापटटी येथे पार्किग ची व्यवस्था केली गेल्या मुळे घाटात टॅफीक कमी झाले तसेच टॅक्सी चालक ही शिस्त पाळताना दिसत होते.








Be First to Comment