
सिटी बेल लाइव्ह / रसायनी –राकेश खराडे #
चक्रीवादळामुळे रसायनीतील चांभार्ली बसथांब्याजवलील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरील निवारा शेड चक्री वादळात उडून गेली.मुसलधार पावसात चांभार्ली शिवस्मारकाला निवारा शेड नसल्याने या स्मारकाची बिकट अवस्था झाली होती. महाराजांचे स्मारक पावसामध्ये भिजत होते.मात्र दोन महिने होवूनही शिवस्मारकाकडे कोणीही लक्ष न दिल्याने एक सामाजिक संदेश म्हणून एक हात समाजसेवेसाठी या सामाजिक उपक्रमासाठी रसायनीतील युवकांनी पुन्हा एकदा शिवभक्त असल्याचा अभिमान बाळगत चांभार्ली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरील निवारा शेड नविन करून व सभोवतालच्या परिसराचे सुशोभीकरण तसेच रंगरंगोटी करून सामाजिक कार्यं जोपासले आहे.याकरीता रसायनीतील केदार शिंदे, अजित पाटील, पंकज जाधव ,नरेंद्र पाटील, रोशन ठोंबरे ,जगदीश कोंडीलकर, सुशांत पाटील, ऋतिक पाटील ,शुभम बाबर,
प्रथमेश गायकवाड ,लखन , निशांत आदी शिवभक्तांच्या सहकार्यांतून शिवस्मारकाला निवारा शेड उभारून शिवस्मारकाभोवतालची साफसफाई करून रंगरंगोटी करण्यात आली आहे.






Be First to Comment