ज्ञानदिप माजी विद्यार्थी संघटनेच्या अथक परिश्रमामुले शाळेला आले सोनेरी दिवस
सिटी बेल लाईव्ह /अजय शिवकर /केळवणे #
कोकण एज्युकेशन सोसायटी केळवणे हायस्कूल दहावी बोर्ड परिक्षेचा निकाल १००% लागला असून तो आतापर्यतच्या ३५ वर्षातील ऐतिहासिक निकाल आहे ,एकूण ७६ पैकी ७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाली.
पहिले पाच क्रमांकांवर मुलींनी आपले स्थान मिळवून बाजी मारली.
प्रथम क्रमांक कु.स्नेहल कमलाकर पाटील ८९.६०%, दुसरी कु.सानिया आनंत माळी ८७.८०% ,तिसरी कु.आचल राजेश पाटील ८७.४०%, चौथी कु.श्रद्धा जयवंत गावंड ८६.२०%,पाचवी कु.मिनल रमेश पाटील ८६% तर सहाव्या नंबर वर अनिकेत रमेश पाटील ८३.२०%. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करणारे शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री .बी.वाय. पाटील ,एम.येस.पाटील सर, एन. एल. मांडवकर सर,सौ,भुमिका ठाकुर मॕडम,सौ.लिला आघान मँडम व इतर सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
या यशाचे खरे श्रेय आहे ते ज्ञानदिप माजी विद्यार्थी संघटनेच्या अथक परिश्रमाला ,
या संघटनेच्या स्वयं खर्चाने व साह्याने शाळेला प्रशस्त दुमजळी इमारत व शाळेच्या सभोवतालच्या परिसरात सुरक्षा कुंपण व समोर कमान अशा विविध सुधारणा करून शाळेला एक नवे रूपच नाही तर शाळेतील विद्यार्थ्यांच्या समस्या व सुविधांकडे लक्ष केंद्रित केले ,तसेच एके काळील गावातील हुशार विद्यार्थी ,शिक्षण विस्तार अधिकारी श्री .विठ्ठल नारायण कोळी कमेटी चेअरमन यांचे योग्य मार्गदर्शन व शाळेच्या पहिल्या बॕचचे दहावीत प्रथम येणारे विद्यार्थी देविदास चाह्या शिवकर सध्या कमेटी वर असून विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रेरणा देतात , कमेटी सदस्य आशिष घरत वेळोवेळी विद्यार्थी व शिक्षक यांच्या समस्या समजून घेतात तर शाळेतील यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी सन्मानीत करून नवोदित विद्यार्थ्यांना अथक परिश्रम करण्यास कमेटी प्रोत्साहीत करते असे कमेटी सदस्य श्री .प्रकाश हिराजी शिवकर यांनी सांगितले.






Be First to Comment