Press "Enter" to skip to content

साने गुरुजी जयंतीनिमित्त राष्ट्रसेवादलाचा उपक्रम

चिमुकल्या हातांनी बदलले महाड शहरातील पुरबाधित शाळांचे बहिर्रंग

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

परमपूज्य साने गुरुजी जयंतीनिमित्त राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी तसेच माणगाव तालुक्यातील वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे महाड नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 1 व 2 मध्ये रंगांची शाळा हा उपक्रम आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ चित्रकार राजू सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात आला.

राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने महाड येथील नगरपरिषदेच्या शाळेत साकारलेली रंगाची शाळा या उपक्रमामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज,महाड चे एनएसएस आणि एनसीसीचे विद्यार्थी कॉलेजचे प्रा.विक्रांत बागडे,प्रा.संजय वाबळे, प्रा.विश्वास पाटील, कॅप्टन एन.आर.चव्हाण, प्रा. बटावले, प्रा.शिंदे तसेच महाड नगर परिषद शाळा क्रमांक 1चे मुख्याध्यापक भरत जाधव,दिनकर बहिरम,स्नेहल माळवदे,दीपाली हाटे, शाळा नंबर 2 च्या मुख्याध्यापिका मिनिता हाटे,स्नेहल टिपणीस,सुप्रिया मोरे, स्नेहा चिखले, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार राजू सुतार, चित्रकार संदीप गुरव,वैशाली ओक,नवीन परमार,हितेश उतेकर, राष्ट्रसेवा दल आणि सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे कार्यकर्ते संजय मं.गो. सिरत सातपुते, शरद कदम,महादेव पाटील, लतिका सु.गो. मिलिंद टिपणीस, सावित्री मुंढे,मेनका मुंढे,किशोरी लाड, गीतांजली पाटील,मारुती पवार,प्रशिक गायकवाड,बाबाजी धोत्रे, शाळेतील विद्यार्थी,पालक,स्थानिक रिक्षा चालक मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी संजय मंगो यांनी महाड शहरातील पुरहानीनंतरदेखील राष्ट्रसेवा दलामार्फत पुरग्रस्तांना थेट मदत देण्याचा उपक्रम नगरपालिकेच्या नवीन इमारतीमध्ये घेण्यात येऊन हातगाडया, टर्पयांची दुकाने, शिलाई मशीन तसेच अन्य उपकरणांचे मोफत वाटप करून यशस्वी करण्यात आला. मात्र, राज्य सरकारकडून काही ठोस मदतीसाठी पाठपुरावा करीत असताना शाळागृहे व अन्य सार्वजनिक इमारतींना सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न करताना नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 1 आणि 2 मध्ये राष्ट्रसेवा दलाच्या महाड युनिट तर्फे सुस्थितीत आणण्यासाठी प्राप्त झालेल्या सुचनेनुसार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार राजू सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू केले, अशी माहिती दिली.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ चित्रकार राजू सुतार यांनी, यावेळी शाळांमध्ये येर्णाया विद्यार्थी विद्यार्थिनींना सिलींग फँनच्या उंचीपर्यंत चिखलाने माखलेल्या इमारतींमध्ये शिक्षण घेताना निश्चितच वेगळी भावना असेल हे लक्षात घेऊन साने गुरूजी जयंती निमित्त रंगांची शाळा उपक्रम याच लहानग्या हातांनी राबविण्याचे ठरविले आणि सर्वांनी मनमुरादपणे आनंद घेत शाळेची इमारतदेखील आनंदी केल्याचे यावेळी सांगितले.

यावेळी माजी विद्यार्थिनी असलेल्या त्रिशाला गंभीरे या पालक महिलेने आपल्या पाल्यांसमवेत रंगांचा आनंद घेतल्याचे आवर्जून सांगितले. सायंकाळी महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी या रंगांच्या शाळेला भेट देऊन राष्ट्रसेवा दलाचे विशेष कौतुक केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.