Press "Enter" to skip to content

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र यांच्या वतीने सत्कार

पत्रकार राज वैशंपायन यांचा झी 24 तास चे संपादक निलेश खरे यांच्या हस्ते सन्मान

सिटी बेल | नागोठणे | याकुब सय्यद |

नागोठणे येथील महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष तथा माझा रायगड लाईव्ह चे संपादक राज वैशंपायन हे पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असल्याबाबत त्यांचा दादर येथे नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र यांच्या वतीने झी 24 तास चे संपादक निलेश खरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार संजय राऊत – कार्यकारी संपादक सामना,डॉ. भालचंद्र मुणगेकर माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ,विनोद घोसाळकर अध्यक्ष म्हाडा उपस्थित होते.

मुंबई विद्यापिठाची पत्रकारिता क्षेत्रातील मानाची अशी ( B. M. M) बॅचलर ऑफ मास मीडिया ही पदवी देखील राज वैशंपायन यांनी संपादन केली आहे. त्याच बरोबर अल्पवधीत आपल्या पत्रकारितेचा ठसा नागोठणे विभागात चांगल्या प्रकारे उमटवला आहे. आपल्या धारदार लेखणीतून त्यांनी कित्येकदा अन्यायाल वाचा फोडली आहे. विविध आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेऊन गोरगरिबांना न्याय मिळवून दिला आहे. आजवर त्यांनी मोठ मोठया दैनिकांमध्ये वृत्तलेखनाचे उत्कृष्ट कार्य केले आहे.

माझा रायगड लाईव्ह या वृत्तवाहिनीने च्या माध्यमातून विविध प्रश्नाला वाचा फोडत असून सर्वसामान्य जनतेसाठी हक्काने भांडताना दिसत आहेत आज त्यांना मुंबई विद्यापीठाची मानाची अशी बी. एम. एम पदवी मिळाल्या बद्दल नागोठणे विभागतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.