माथेरान गेले पर्यटकांनी गजबजून : पर्यटकांसाठी नगरपालिका आणि हाॅटेल व्यावसायिकांचे सुयोग्य नियोजन
सिटी बेल | माथेरान | मुकुंद रांजाणे |
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी माथेरान पर्यटकांनी गजबजून गेले असून नगरपरिषदे मार्फत सुयोग्यप्रकारे नियोजन करण्यात आले आहे.पोलीस प्रशासनाने सुध्दा कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी बारकाईने लक्ष वेधले आहे.वर्षाचा हा शेवटचा व्यावसायिक हंगाम असल्याने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व्यापारी, दुकानदार छोटे मोठे स्टोल धारक सज्ज झालेले आहेत.
माथेरानचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर पर्यटकांच्या स्वागतासाठी सांताक्लॉजच्या वेशात नगरपरिषदेचा कर्मचारी असून वेगवेगळ्या बाहुल्या सुध्दा बालगोपालांचे खास आकर्षण ठरत आहेत.आकर्षक विद्युतरोषणाई,रंगीबेरंगी फुग्यांच्या कमानी आणि लहान लहान मुलांना चॉकलेटचे वाटप सांताक्लॉज करीत आहेत त्यामुळे यांच्यासोबत मोबाईल कॅमेऱ्यात फोटो काढण्यासाठी पर्यटक गर्दी करतांना दिसत आहेत.यासाठी नगरपरिषदेचे गटनेते प्रसाद सावंत आणि शालिमार होटेलचे व्यवस्थापक बदलापूर येथील उद्योजक संतोष चौधरी यांच्या स्वखर्चाने आणि पुढाकाराने केलेले आहे.
वनखात्याच्या मार्फत गाड्यांची पार्कींग व्यवस्था चोखपणे पार पाडली जात आहे.पर्यटक घोडेस्वारीचा आंनद घेत असून आबालवृद्ध मंडळी हातरीक्षा मधून पॉईंट्सची सैर करीत आहेत. बाजारपेठेत
चिक्की, चपला तसेच खेळणी खरेदीसाठी गर्दी पहावयास मिळत आहे. तर एखाद्या स्टॉलवर सरबत आणि या गुलाबी थँडीच्या मोसमात भाजलेल्या मक्यांना तसेच गरमागरम भजी वडापाव खाण्यासाठी खवय्यांची झुंबड उडाली आहे.एकंदरीतच माथेरानला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.








Be First to Comment