सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
उरण तालुक्यातील रूग्णांची संख्या वाढत चालली असुन त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आपल्याकडून काही मदत व्हावी ह्या उद्देशाने जसखार गावचे सुपुत्र प्रशांत पांडुरंग पाटील यांनी कोविड केअर सेंटर (केअर पॉईंट हॉस्पीटल) येथील रूग्णांना व त्या रूग्णांची सेवा करीत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना ३० वाफारा मशीन (स्टीम व्हेपरायझींग मशीन) आणि ५ ऑक्सीमिटर देण्यात आले.
त्यामुळे कोरोना बाधीत रूग्णांना आणि हॉस्पीटलमधील कर्मचाऱ्यांना नियमीत वाफारा घेतल्याने आपला नाक व घसा मोकळा होण्यास मदत होईल व रूग्ण लवकर बरे होवुन घरी परततील. तसेच सर्व कर्मचारी स्वस्थ राहिल्याने त्यांना त्यांची सेवा जास्त चांगल्या पद्धतीने देता येईल.
सर्व रूग्ण तसेच कर्मचारी वर्ग आणि हॉस्पीटल प्रशासन यांनी प्रशांत पाटील यांचे आभार मानले. सदर वाटपाची जबाबदारी त्यांनी मोहन जगताप, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार आणि प्रा. राजेंद्र मढवी यांना दिली होती, ती त्यांनी योग्य प्रकारे पार पाडत वाटप करण्यात आले.






Be First to Comment