मनसेच्या आशीष ठाकरे यांनी घेतली अलिबाग उप वनसंरक्षक यांची भेट
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
महाराष्ट्र नव निर्माण सेना माथेरान शहर यांच्या वतीने उप वनसंरक्षक आशीष ठाकरे यांची अलिबाग येथील कार्यलयात भेट घेउन माथेरान च्या विषयी चर्चा केली.
यावेळी माथेरान मधील पाॅईट वर जे स्थानिक भुमिपुत्र व्यवसाय करित आहेत, त्यांना दुकाने कायमस्वरूपी किंवा अकरा महिनाच्या करावर नियम व अटी यांचे पालन करून द्यावीत, परंतु कोणावरही अन्याय करू नये कारण माथेरानला इतर कुठलाही व्यवसाय नसुन केवळ पर्यटन हीच शेती असल्याने स्थानिक केवळ पर्यटनावर अवलंबून राहाव लागत आहे.
उप वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी सर्वतोपरीने मदत करण्याचे आश्वासन उपस्थित मनसे पदाधिकाऱ्यांना दिले, यावेळी मनसे तालुक अध्यक्ष महेंद निगुडकर, उप जिल्हा अध्यक्ष महेश कन्नूमल, माथेरान शहर अध्यक्ष संतोष कदम, अलिबाग शहर अध्यक्ष राजेश थळकर, आसिफ खान, रवींद्र कदम, शैलेश घाग उपस्थित होते.








Be First to Comment