चर्मकार समाजाचे प्रलंबित मागण्या विधिमंडळात उपस्थित कराव्यात : भारत वाघमारे
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
महाराष्ट्रात चर्मकार समाजाचे 14 आमदार निवडून आले आहेत त्यांनी चर्मकार समाजाच्या मागण्यांबाबत विधानसभेत आवाज उठवावा अशी मागणी कर्जत मधील चर्मकार समाजाचे कार्यकर्ते भारत वाघमारे यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांना चर्मकार समाजाचे कर्जत मधील कार्यकर्ते व लीडकॉम सेवानिवृत्त व्यवस्थापक यांनी चर्मकार समाजाच्या प्रलंबित मागण्या तसेच लिडकॉम व संत रोहिदास चर्मकार आयोगाच्या कामकाजाबाबत निवेदन पाठवून चर्मकार समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधले आहे.
संत रोहिदास चर्मकार कल्याण आयोगाचे काम सुरू करावे, लीडकॉम मार्फत देण्यात आलेले कर्ज माफ करावे, लीडकॉमच्या कारभाराबाबत सुधारणा करावी, महामंडळास कार्यक्षम व्यवस्थापकीय संचालक यांची नेमणूक करावी, कोल्हापूर येथे चर्मउद्योग प्रशिक्षण केंद्र सुरु करावे, महामंडळाची उत्पादन केंद्राचे नूतनीकरण करावे, महामंडळाचे कर्मचारी रिक्त पदे भरावीत, गटई कामगारांसाठी स्टॉल खरेदीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी, महामंडळामार्फत कर्ज योजना सुरू करावी व महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा अश्या मागण्या त्यांनी खासदार शरद पवार यांना निवेदन पाठवून केल्या आहेत.








Be First to Comment