माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेतील सभापतींची मुदत संपल्यामुळे राजीनामा द्यावा – संचालक वसंत कदम
सिटी बेल | माथेरान | मुकुंद रांजाणे |
माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक लांबल्याने सहकारी पतसंस्थेच्या सभापतीपदी असलेले हेमतं पवार यांना त्यांची मुदत संपल्यानंतर नंतर ही ते पद भुषवित आहेत.मागच्या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी,शिवसेना ,भा.ज.पा मिळुन विस,विस महिने अध्यक्ष पद भुषवायच ठरले होते.त्याप्रमाणे पहिल्या वीस महीने अजय सावंत,यांनी व त्यानंतरच्या वीस महीने स्वर्गिय हेमंत बिरामणे आणि शेवटचे वीस महीने हेमंत पवार हे सभापती पदावर आहेत.पवार यांचे वीस सहीने संपुन बरेच महीने झालेत.व पतसंस्थेची निवडणूक ही लांबली आहे त्यामुळे अध्यक्षाने राजीनामा देऊन दुसऱ्या संचालकांला अध्यक्षपदाची संधी द्यावी . कारण मीटीगंला ठराविक सदस्यच उपस्थित असतात त्यामुळे लोकशाहीचा मान ठेवूनही स्वतःहुन राजीनामा दिल्यास त्यात मान आहे. संस्था सर्व सभासदांची आहे त्यामुळे दोघेच संस्था चालवतात असे चित्र दिसु नये.यासाठी पवार यांनी स्वखुशीने राजीनामा द्यावा अशी मागणी संचालक वसंत नारायण कदम यांनी केली आहे.
पतसंस्थेच्या निवडणूकीला वेळ आहे त्यामुळे सध्या हेमंत पवार हे सभापती पदावर कार्यरत आहेत त्यांची ठरल्याप्रमाणे वीस महिन्यांची मुदत संपलेली आहे त्यामुळे त्यांनी नैतिकतेला धरून अन्य संचालकास त्या जागी काम करण्याची संधी द्यायला हवी.
अजय सावंत — माजी सभापती मा. ना. स. पतसंस्था माथेरान
या संस्थेची मुदत ७ एप्रिल २०२० मध्ये संपलेली आहे. कोरोनाच्या एक दोन लाटेमुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या सहकार्य खात्याने नवीन निवडणूका होऊन नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येईपर्यंत विद्यमान संचालक मंडळाला प्रभारी कारभार पाहण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी सुध्दा २०११ मध्ये संस्थेच्या संचालक मंडळाची मुदत संपली असताना २०१५ पर्यंत नव्यानं संचालक मंडळ अस्तित्वात येईपर्यंत तत्कालीन संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यात आली होती. सद्यस्थितीत प्रलंबित सहकारी संस्थांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यातील सुरू आहेत. तर माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक ही चौथ्या टप्प्यात होईल असा अंदाज आहे. तसा कार्यक्रम निवडणूक प्राधिकरण सहकारी संस्था पुणे यांच्या मार्फत रीतसर जाहीर केला जाईल.
योगेश जाधव — सचिव माथेरान नागरी सहकारी पतसंस्था माथेरान








Be First to Comment