Press "Enter" to skip to content

आझादीका अमृतमहोत्सव साजरा

पोलादपूर तालुक्यामध्ये महाराजस्व अभियानांतर्गत सुप्रशासन सप्ताहाचा शुभारंभ

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशानुसार महाडच्या उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनानुसार शुक्रवार दि. 24 डिसेंबर 2021 रोजी आझादी का अमृत महोत्सव व महाराजस्व अभियान अंतर्गत सुप्रशासन सप्ताह राबविण्यात आला.

यावेळी पोलादपूर तालुक्यातील नागरिकांसाठी तसेच विद्यार्थी यांच्याकरिता एक दिवस विविध सेवा म्हणून मुख्यालय ठिकाणी नगरपंचायतीच्या हिन्दूहृदयस्र्राट बाळासाहेब ठाकरे सभागृह पोलादपूर येथे विविध योजनांची शिबिरे आयोजित करण्यात आली. याप्रसंगी पोलादपूर तहसिलदार दिप्ती देसाई, निवासी नायब तहसिलदार शरद आडमुठे, नायब तहसिलदार समीर देसाई यांनी या सुप्रशासन सप्ताहात सहभाग घेतला.

यावेळी शासनाच्या जातीचे दाखले, उत्पनाचे व रहिवासी दाखले, संजय गांधी योजनेसंबंधी कामे, नवीन मतदार नोंदणी झालेले ओळखपत्र वाटप, नवीन शिधापत्रिका व दुय्यम शिधापत्रिका तसेच शिधापत्रिका नाव वाढवणे आणि कमी करणे, नवीन आधार नोंदणी तसेच दुरुस्ती, कोविड 19वरील लस पहिला व दुसरा डोस, नागरिकांसाठी आरोग्य तपासणी आणि मंडळाची फेरफार अदालत आदीवरील योजनांचा लाभ नागरिकांना एका छत्राखाली देण्यात आला आहे. यासाठी महसूल विभागाचे सर्व अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, मंडलाधिकारी, तलाठी तसेच शिपाई व कोतवाल कर्मचारी उपस्थित होते.

यामध्ये आरोग्य विभाग तसेच सेतू केंद्र पोलादपूर येथील अधिकारी कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.