बहीण भावाच्या प्रेमळ नात्याची अनोखी गोष्ट सांगणारे गीत : माझी ताई प्रदर्शित !!
सिटी बेल लाईव्ह/ आलिबाग / अमोल नाईक #
पूनम कांबळे यांनी निर्मीती असलेल्या
बहीण भावाच्या प्रेमळ नात्याची अनोखी गोष्ट सांगणारे गीत : माझी ताई गीत पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले. यावेळी इंडियन मेडिकल असो अलिबाग अध्यक्ष डॉ राजेंद्र चांदोरकर, शेकाप सांस्कृतिक सेलचे जिल्हा अध्यक्ष यतीन घरत, डॉ राजश्री चांदोरकर आदी उपस्थित होते.
दरवर्षी नारळी पौर्णिमेनिमित्त अनेक कोळीगीते आपल्याकडे यु ट्यूबवर प्रदर्शित होतात, पण नारळी पौर्णिमेच्या दिवशी आणखी एक तितकाच महत्वाचा सण असतो तो म्हणजे रक्षाबंधन !! रक्षाबंधन कोण्या एक विशिष्ट जातीवर्गासाठी नसून तो सम्पूर्ण देशात, प्रत्येक भावाबहिणीच्या नात्याचा महत्वाचा दिवस मानला जातो, पण या सणावर किंवा या भाऊ बहिणीच्या नात्यावर अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी गाणी उपलब्ध आहेत, गेल्या काही वर्षांत तर भाऊ बहिणीच्या या नात्यावर सुंदरसे गीत आले नव्हते, आणि हाच विचार सचिन कांबळे यांनी केला, लॉकडाऊन च्या काळात रमाबाई आंबेडकरांच्या गाण्यांची व्हिडीओ मालिका करताना त्यांना ही कल्पना सुचली, आणि त्यांनी गीतकार- संगीतकार मनीष अनसुरकर याना ही कल्पना ऐकवली , आणि मग बहिणीला उद्देशून भावाच्या भावनांबद्दल एक गोड धून त्यांनी बनवली, त्यावर नंतर शब्द लिहिले आणि माझी ताई गाणे जन्माला आले.
कोळीगीतांच्या गर्दीत, येत्या राखी पौर्णिमेला हे वेगळे भावपूर्ण गीत यु ट्यूबवर , मायबोली, संगीत मराठी आणि 9 एक्स झक्कास या मराठी वाहिन्यांवर प्रदर्शित होत आहे.
पूनम कांबळे यांनी निर्मीती असलेल्या या गाण्याच्या व्हिडिओची संकल्पना, दिग्दर्शन सचिन कांबळे आणि प्रमुख भूमिका त्यांची मोठी कन्या सई कांबळे
आणि लहान मुलगा अरीन कांबळे हे पडद्यावर खऱ्या भावा बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत.
मनीष अनसुरकर यांनी स्वरबद्ध केलेल्या या गीताला तेवढ्याच गोड आवाजात केवल वाळंज आणि ‘माझं पिल्लू’ फेम गायिका स्नेहा महाडिक यांनी गायले आहे.
प्रवीण कोळी आणि योगिता वाळंज यांनी सह गायन केले आहे. तसेच प्रवीण कोळी यांनी music co- ordinate केले आहे, सुदेश गायकवाड यांनी संयोजन व प्रोग्रामिंग केले आहे.मिक्स मास्टर केवल वाळंज यांनी केले आहे..
अलिबाग आणि आजूबाजूच्या निसर्ग रम्य देखाव्याला कॅमेऱ्यात चित्रित करण्यात छायाचित्रकार सुनीत गुरव आणि संदिप वाटवे यांनी चोख कामगिरी बजावली आहे, संकलन विशाल गायकवाड, ड्रोन फोटोग्राफी प्रणित मोकल आणि कला दिग्दर्शन समीर गायकवाड यांचे आहे.
असा भावा बहिणीची अनोखी गोष्ट सांगणारा ‘ माझी ताई ‘ म्युजिक अल्बम आज प्रदर्शित झाला आहे, एक रसिक प्रेक्षक म्हणून आपण या अनोख्या गाण्याचे स्वागत नक्कीच केले पाहिजे , कारण यातील भावना या प्रत्येक भाऊ बहिणीच्या भावना आहेत…तेव्हा नक्की पाहायला विसरू नका, माझी ताई! Yutube वर जाऊन माझी ताई type करा आणि गाण्याचा आस्वाद घ्या आणि कलाकारांना प्रोत्साहन द्या.






Be First to Comment