सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जांभिवली आदीवासीवाडीत राहणा-या शांताराम दत्तू वाघे(वय 45) यांनी घरात कोणीही नसताना कोणतेतरी विषारी औषध प्यायल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.शांताराम याने विषारी औषध प्राशन करताच त्यास उपचाराकरिता पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असताना डॉक्टरांनी शांताराम यास तपासून मयत घोषित केले.
याबाबत शांतारामची पत्नी पुष्पा वाघे हिने पोलिसांत फिर्याद नोंदविली असून सिआरपीसी 174 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर माहिती रसायनी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे.याप्रकरणी रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस दुसाने अधिक तपास करीत आहेत.







Be First to Comment