दास्तान फाटा जवळ झालेल्या अपघातात १ ठार २ जखमी
सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
गव्हाण येथील हळदी समारंभातून घरी परतत असताना मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात १ जण जागीच ठार तर २ जण जखमी झाले आहेत.
उरण हनुमान कोळीवाडा येथील ५ जण आपल्या नातेवाईकाच्या हळदीला गव्हाण येथे गेले होते. हळदी समारंभागातून आपल्या एर्टिका नंबर एमएच ४६ बीई ६२५४ या वाहनातून घरी परतत असताना दास्तान फाटा येथील शिवस्मारका पासून पुढील काही अंतरावर मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात अविनाश लक्षिमीकांत शेवेकर(५१) हा जागीच मयत झाला तर राज मनोज शेवेकर (२२), कल्पेश मनोज शेवेकर (२५) हे दोघे जखमी झाले आहेत.
उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक विशाल राजवाडे यांनी घटनास्थळी जाऊन ताबडतोब कायदेशीर कारवाई पूर्ण करीत अपघातग्रस्ताना सहकार्य केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
सदर अपघाताचे निश्चित असे कारण समजले नाही. सदर अपघात हा मागून दिलेल्या जोरदार धडकेमुळे झाला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. गाडीची अवस्था बघून अपघात भीषण असल्याचे जाणवते. अपघातातील दुसरे वहान घेऊन चालक फरार झाल्याचे समजते पुढील तपास उरण पोलीस करीत आहेत.








Be First to Comment