शेतकरी कामगार पक्षाकडून कुसुंबळे येथे 117 मुलींना सायकलींचे वाटप
सिटी बेल | अलिबाग |
रायगड जिल्हयातील सावित्रीच्या लेकींनी शिकून रायगडचे नाव मोठे करावे यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने कुसुंबळे विभागातील सुमारे 117 विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले.

यावेळी माजी आमदार पंडित पाटील,जिल्हा परिषदेच्या सदस्यां चित्रा पाटील,शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख तथा अलिबाग नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेविका चित्रलेखा पाटील,पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, माजी सभापती विद्या म्हात्रे, माजी उपसभापती प्रकाश पाटील, विलास म्हात्रे, नरेश म्हात्रे, सुनिल पिंगळे, धुमाळ गुरुजी, अमृत गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.

बहुतांश विद्यार्थी खेड्यापाड्यातून किंवा दूर अंतरावरून शहरामध्ये शिकण्याकरिता येत असतात. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत जाण्यासाठी वेळेवर कोणत्याही प्रकारचे साधन अथवा वाहन उपलब्ध नसते. त्यामुळे त्यांना पायी शाळेत यावे लागते. शाळेच्या येण्या-जाण्याच्या प्रवासामध्ये जास्त जास्त वेळ वाया जात असतो.त्यामुळे त्याचा परिणाम विद्यार्थिनीच्या शिक्षणावर होत असतो.

रायगड जिल्हयातील बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागात राहत असून त्यांना शिक्षण घेण्यासाठी चार तर पाच किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.विदयार्थीनीचा वेळ वाचवा आणि त्याचा वाचलेला वेळ हा शिक्षण घेण्याच्या कामासाठी लागावा या उद्देशाने शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने
कुसुंबळे येथील 117 मुलींना सायकलींचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

मुलींच्या शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करुन शिक्षणाचे परिणामकारक बदल राबविण्यासाठी सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे हा वारसा पुढे नेत शेकापक्षाच्या माध्यमातून 1 लाख सायकलींचे वाटप करण्याचा निर्धार आहे. मागील दोन वर्षात आम्ही जवळपास साडे नऊ कोटी रुपयांची आरोग्य आणि कोविडसाठी मदत केली असल्याचे शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख तथा अलिबाग नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेविका चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.








Be First to Comment