महाराजस्व अभियानांतर्गत आज पोलादपूर शहरात विविध उपक्रम
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
तालुक्यातील जनतेसाठी विविध शासकीय कामकाजासंदर्भात महाराजस्व अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नायब तहसिलदार शरदकुमार आडमुठे यांनी दिली.
रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर व महाड उपविभागीय अधिकारी महाड प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय पोलादपूर तर्फे आझादी का अमृत महोत्सव व महाराजस्व अभियाना अंतर्गत बाळासाहेब ठाकरे सभागृह पोलादपूर येथे शुक्रवार दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 ते 3 वाजता तहसील विभागाच्या विविध सेवा देण्याकरिता एक दिवसीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात विविध दाखले, रेशन कार्ड संबंधित कामे, संजय गांधी योजना संबधित कामे, मतदार यादीत नाव कमी करणे – वाढवणे, आधार नोंदणी ई. कामे तात्काळ करून देण्यात येणार आहेत. तरी पोलादपूर तालुक्यातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
सभागृहाच्या ठिकाणी लसीकरण व रक्त तपासणी देखील केली जाणार आहे, याचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन नायब तहसिलदार आडमुठे यांनी केले आहे.







Be First to Comment