सिटी बेल इम्पॅक्ट : रात्रीच्या अंधारात हफ्तेगीरी करणाऱ्या पेण पोलिस चौकीतल्या ट्राफिक पोलीसांची म्हसळ्याला बदली
सिटी बेल | पेण | वार्ताहर |
पेण येथे महामार्गावरील चौकीत कार्यरत असलेल्या ट्राफिक पोलिसांची बातमी सिटी बेल ने प्रकाशित केल्या नंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. याची दखल वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेऊन पोलीस मिलिंद पाटील व पांडू पाटील यांची तात्काळ म्हसळा पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील पेण रामवाडी येथे असणा-या पोलिस चौकीत मागच्या दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी डुटीवर असणारे ट्राफीक पोलिस मिलिंद पाटील, पांडू पाटील यांनी महाबळेश्वर वरून उरणकडे जाणाऱ्या खाजगी प्रवाशी बस ला अडवून वाहन चालकाकडे पेपरची मागणी केली. त्यानुसार चालकाने सर्व पेपर दाखविले पेपर बरोबर असतानाही पोलिसांनी इंन्ट्री फी म्हणून २०० रूपये हप्ता मागितला पण चालकाने त्यांना १०० रूपये दिले आणि तो बस घेऊन पुढे खारपाडा कडे रवाना झाला.
मात्र सदर पोलिसांना हा हप्ता कमी पडल्याने त्यांनी मागावून गाडीचा फोटो मारून ५०० रुपयांचा सिग्नल वायोलेशन हे चलन फाडले या चलनाचा मेसेज गाडी मालक राजा अण्णा खारघर यांच्या मोबाइलवर रात्री १२.२० च्या दरम्यान आला त्यानुसार मालकांनी वाहनचालकाला गाडी परत पाठीमागे फिरवून चौकीत आणायला सांगितली त्यानुसार चालकाने याबाबत पोलिसांना विचारले असता पोलिस मिलिंद पाटील यांनी अरेरावी करण्यास सुरुवात केली मात्र त्याच दरम्यान बस मालक राजा अण्णा हे रायगड बस मालक युनियन अध्यक्ष समीर माखिजा, अमित गावंड, संदीप म्हसकर व इतर सदस्य यांना घेऊन तेे १२.४५ च्या दरम्यान चौकीवर धडकलेे असता त्यांनी या हप्तेखोर पोलिसांची चांगलीच कानउघडणी केली.
त्यानंतर आपली चुक लक्षात येता सदर
पोलिसांनी बस मालक, चालक, युनियनचे अध्यक्ष, सदस्य यांची माफी मागितली मात्र सदर प्रकरणाची तक्रार वरिष्ठांकडे करणार असल्याचे युनियनचे अध्यक्ष यांनी सांगितले तसेच सिटी बेल ने ही बातमी रात्री घडलेल्या प्रकाराच्या व्हिडिओसह प्रकाशीत केली. आत्तापर्यंत हजारों वाचकांनी ही बातमी वाचली आणि पाहीली आहे. याची माहिती वरिष्ठांना मिळताच हफ्तेखोर पोलिस मिलिंद पाटील, पांडू पाटील यांची तात्काळ म्हसळा पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. परंतु यातील हफ्तेखोर पोलिस मिलिंद पाटील याची हीच सवय असून तो अनेकांकडून हफ्ते गोळा करीत असल्याचे नागरीकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे याला तात्काळ निलंबित करावे अशी मागणी होत आहे.








Be First to Comment