नियमांचा भंग केल्यास कारवाई करणार : तहसीलदार विक्रम देशमुख
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
गेली दोन वर्ष आपण कोरोना महामारीच्या सावटा खाली आहोत, ख्रिसमस, नाताळ आणि नविन वर्षाचे स्वागत करत असताना नियमांचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर प्रशासकीय कारवाई केली जाईल अशी माहिती कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली.
कोरोना अजून पूर्णतः संपलेला नाही त्यामध्ये अजून ओमिक्रॉंन मुळे चिंतेत वाढ झाली आहे अशा प्रसंगी विनाकारण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती विरोधात प्रशासकीय कारवाई केली जाईल, कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट, फार्म हाऊस आहेत त्या ठीकाणी नाताळ सण, नवं वर्षाचे स्वागत कार्यक्रम आयोजित केले जातात.महसूल विभाग आणि संबंधित पोलीस ठाण्याचे परवानगी शिवाय जे कार्यक्रम आयोजित केले जातील त्यावर महसूल विभाग आणि पोलीस ठाण्याची करडी नजर राहणार आहे.
कोव्हीड-19 प्रतिबंध लसीचे दोनही डोस घेतले असतील त्यांनाच कर्जत तालुक्यात प्रवेश दिला जाणार आहे, मास्क बंधनकारक असणार आहे, सामाजिक अंतर पाळले पाहिजे, महसूल विभाग आणि पोलीस ठाण्याची परवानगी घेऊन जे आयोजक कार्यक्रम आयोजित करतील त्यांना वेळेचे बंधन पाळणे आवश्यक आहे, जे शासकीय नियमांचे पालन करणार नाही त्यावर कठोर कारवाई केली जाईल असे तहसीलदार देशमुख यांनी सांगितले.








Be First to Comment