म्हाडा कॉलनीतील धोकादायक विद्युत पोल व वृक्षाची विजवितरण अधिका-यांकडून पाहणी
सिटी बेल| कर्जत | संजय गायकवाड |
म्हाडा कॉलनीतील धोकादायक विद्युत पोल व वृक्षाची पाहणी विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली असून विद्युत पोलचे स्थलांतरण लवकरच होणार आहे तर धोकादायक वृक्षांच्या फांद्याही छाटल्या जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
विज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश देवके यांनी दिलेल्या आश्वासनानुसार महावितरणचे योगेश साबळे,राजेंद्र मरळे, शेख मौल्ला, रोशनी रोकडे यांनी म्हाडा कॉलनीतील धोकादायक पद्धतीने लावलेल्या विद्युत पोलची तसेच विज वाहिनीवर लोंबकळत असलेल्या झाडांच्या फांद्यांची पाहणी केली असुन दोन तीन दिवसातच ठेकेदाराकडुन धोकादायक पोलचे स्थलांतरण करून झाडांच्या फांद्या छाटण्याच्या कामास सुरुवात केली जाईल व म्हाडा वसाहतीसाठी मंजुर झालेला ट्रान्सफार्मर लावण्यात येईल असे त्यांनी सांगितले. सदर प्रसंगी स्थानिक नगरसेविका स्वामिनी मांजरे, प्रशांत जगताप, डॉ. विनय सांगळे, रुपेश डोळस,यशोधन गोतारणे आदि रहिवाशांसह सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गंगावणे उपस्थित होते.सुमारे दोन वर्षांपासुन प्रलंबित असलेले काम लवकरच मार्गी लागणार आहे.








Be First to Comment