Press "Enter" to skip to content

रायगड जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीत 74.20 टक्के मतदान

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (21 डिसेंबर) अमाप उत्साहात मतदान झाले.प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात सरासरी 74.20 टक्के मतदान झाले आहे. दि.22 जानेवारीला या मतदानाची मतमोजणी होणार आहे.102 पैकी 79 प्रभागात हे मतदान घेण्यात आले. यासाठी 233 उमेदवार उभे आहेत.

माणगाव, पोलादपूर, तळा, म्हसळा, खालापूर आणि पाली या नगरपंचायतींसाठी हे मतदान घेण्यात आले. पोलादपूरमध्ये सरासरी 75 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या सहा नगरपंचायतींसाठी 34 हजार 639 मतदारांपैकी 25,703 मतदारांनी हक्क बजावला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.