Press "Enter" to skip to content

तोडलेली झाडे जप्त करण्याची वृक्षप्रेमींची मागणी

पेण येथील मृदगंधार बिल्डरला झाडांची तोड केल्याप्रकरणी 10 हजार रुपयांचा दंड

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

पेण तालुक्यातील आंबेघर येथे सुरू असलेल्या युनायटेड ग्रुपच्या मृदगंधार बिल्डर व्यावसायिकाने तेथील असलेली असंख्य झाडे वनविभागाची परवानगी न घेता तोडली असल्याने वनविभागाने सदर बिल्डरवर १० हजार रुपये दंडात्मक कारवाई केली असून एका झाडामागे पाच झाडे लावण्याची तंबी देण्यात आली आहे.मात्र सदर झाडे जप्त करण्यात यावी अशी मागणी वृक्ष प्रेमींकडून करण्यात आली आहे.

पेण शहराला लगत असलेल्या तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या बिल्डर लाॅबीने बस्तान बांधायला सुरुवात केली असून अनेक ठिकाणी बिल्डर व्यवसायीकांनी बिल्डिंग उभ्या केल्या आहेत त्यातच पेण पुर्व विभागातील आंबेघर येथे सुरू असणाऱ्या मृदगंधार या मोठ्या संकुलासाठी सदर व्यावसायिकांने वन विभागाची कोणतेही परवानगी न घेता खाजगी जागेतील मौजै आबेघर सर्वे नंबर ५४, ५६/२, १०७, १०८ या मधील साग, वावल, जांभूळ, उंबन, सावर, ऐन यासह इतर जवळपास २० ते २५ झाडांची कत्तल केली असल्याने याप्रकरणी पेण वनविभागाने सदर बिल्डरवर १० झाडांमागे महाराष्ट्र वृक्ष तोड अंतर्गत कायदा १९६४ कलम ३ अन्वये १० हजार रुपये दंडात्मक कारवाई केली असल्याचे पेण वनपरिक्षेत्र अधिकारी के.बी.पाटकर यांनी सांगितले.तर शासनाची फसवणूक करून कर बडविणा-या अशा बिल्डर व्यावसायिकांवर अधिक दंडात्मक कर लावून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येऊन सदर तोडलेली झाडे वनविभागानी जप्त करावी अशी मागणी तालुक्यातील वृक्षप्रेमींकडून होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.