सिटी बेल लाइव्ह / उरण (घनश्याम कडू)
देशात कोरोनाच्या महामारीला ४ महिने पूर्ण झाले आहेत. कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात उलथापालथ होताना दिसत आहे. कामगारांसमोर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नाकडे लक्ष वेधावे म्हणून २४ ते ३० जुलै या काळात भारतीय मजदूर संघाच्या वतीने सरकार जगाओ अभियान राबविण्यात आला होता.
यामध्ये असंघटीत कामगारांचा जीवन मरणाचा प्रश्न, लॉकडाऊन काळात कामगारांची वेतन व नोकर कपात, कामगार कायद्यांचे निलंबन, उद्योग धंद्यांचे खासगीकरण व निगमीकरणाला विरोध या सर्व प्रश्नांसाठी दि. २४ ते ३० जुलै दरम्यान सरकार जगाओ अभियान भारतीय मजदूर संघाच्या वतीने आज जेएनपीटी टाऊनशिप येथेसंपन्न झाला.
यावेळी संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील, सेक्रेटरी रमेश गोविलकर, संघटक श्रीधर लहाने, कोकण विभाग संघटक ऍड. अनिल ढुमने व कामगार वर्ग उपस्थित होते.






Be First to Comment