Press "Enter" to skip to content

उमेदवारांच्या प्रचारार्थ नेत्यांनी पिंजून काढले सर्वच प्रभाग

पोलादपूर नगरपंचायतीत काँग्रेस पक्षच बाजी मारणार : जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

शिवसेनेच्या नाकर्तेपणामुळे मतदारांमध्ये प्रचंड रोष दिसून येत असून येत्या मतदानातून हा रोष मतदार व्यक्त करतील, अशी प्रतिक्रिया रायगड जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ बोलताना व्यक्त केली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी या निवडणुकीमध्ये बाजी मारेल, असा विश्वासही यावेळी जिल्हाअध्यक्ष घरत यांनी व्यक्त केला.

पोलादपूर नगरपंचायत निवडणुकीत मतदानाला काही दिवसच शिल्लक असून शुक्रवारी दुपारनंतर रायगड जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग 9 च्या उमेदवार तेजश्री अभिषेक गरुड आणि प्रभाग 11 चे उमेदवार स्वप्नील सुभाष भुवड यांच्या प्रचारार्थ पोलादपूर येथे आले होते.

रायगड जिल्हा सहप्रभारी श्रीरंग बर्गे, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, जिल्हा सरचिटणीस धनंजय देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीधर सकपाळ, जिल्हा सरचिटणीस प्रशांत महामुणकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन बंडूशेठ देशमुख, पोलादपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अजय सलागरे, महाड तालुका अध्यक्ष राजु कोरपे, माजी तालुका अध्यक्ष कृष्णा शिंदे, महाराष्ट्र विद्यार्थी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीयश जगताप, मार्तंड नाखवा, पोलादपूर शहर अध्यक्ष अमोल भुवड, युवक अध्यक्ष सचिन दुदुसकर, जिल्हा युवक सरचिटणीस मुन्ना शिंदे, जिल्हा युवक उपाध्यक्ष मयूर चांदोरकर, विधानसभा युवक अध्यक्ष ऍड. सचिन गायकवाड, विधानसभा विद्यार्थी अध्यक्ष अनिकेत येरूणकर, तालुका विद्यार्थी अध्यक्ष प्रसाद देशमुख सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी, पोलादपूर नगरपंचायतीच्या निवडणुकप्रचारामध्ये महाड विधानसभा काँग्रेसचे नेते हनुमंत जगताप यांच्या नेतृत्वाखाली तरुण कार्यकर्त्यांचा व युवतींचा उत्साह आणि जेष्ठ मंडळींचा सहभाग पाहता या नगरपंचायतीवर पक्षाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी प्रभाग 1 मीनल जगताप, प्रभाग 3 निखिल कापडेकर, प्रभाग 4 अर्चना शिंदे, प्रभाग 5 अपर्णा कदम, प्रभाग 6 समिधा महाडीक, प्रभाग 7 आशा गायकवाड, प्रभाग 9 तेजश्री गरूड, प्रभाग 11 स्वप्नील भुवड, प्रभाग 12 श्रावणी शहा, आणि प्रभाग 17 दिलीप भागवत आदी उमेदवार उपस्थित रॅलीमध्ये सहभागी झाले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.