पोलादपूर नगरपंचायतीमध्ये होऊ घातलेल्या कोटयवधी रूपयांच्या विकासकामांची पुर्तता करण्यासाठी पुन्हा संधी द्या : आमदार गोगावले
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
कोटयवधी रुपयांची विकासकामे पोलादपूर शहरात केली आहेत आणि उर्वरित प्रस्तावित कामे करण्यासाठी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामाध्यमातून तीन कोटी रुपयांची मंजुरी आणलेली असून या विकासकामांच्या पूर्ततेसाठी पुन्हा नगरपंचायतीमध्ये शिवसेनेला संधी द्या, असे आवाहन करीत आ.भरत गोगावले शिवसेनेच्या कार्यकर्त्यासमवेत सर्व सोळा उमेदवारांच्या प्रभागांतील मतदारांच्या दारापर्यंत पोहोचले.
या प्रचार फेरीत जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे तालुका प्रमुख निलेश अहिरे शहरप्रमुख अण्णा गायकवाड माजी शहर प्रमुख सुरेश पवार विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे आणि शहरातील शिवसैनिक युवासैनिक महिला भगिनी आणि उमेदवार इत्यादी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रभाग 17 चे उमेदवार सुरेश पवार प्रभाग 13 मध्ये सिध्देश शेठ, प्रभाग 15 मध्ये विनायक दिक्षित, प्रभाग 1 मध्ये सुनीता पार्टे आणि प्रभाग 6 साठी अस्मिता पवार, प्रभाग 12 मध्ये मृगया शहा, प्रभाग 3 साठी रोहित सावंत, प्रभाग 5 साठी शिल्पा दरेकर, प्रभाग 7 साठी सुषमा पवार इत्यादी उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार रॅली काढल्या.








Be First to Comment