Press "Enter" to skip to content

अप्रगत मुलांचा दवाखाना या नाविण्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमाचे उद्घाटन

अप्रगत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कर्जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे एक पाउल……

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

अप्रगत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कर्जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे एक पाउल पुढे अप्रगत मुलांचा दवाखाना या नाविण्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले

कर्जत तालुक्यातील केंद्र खांडपे येथे शिक्षण परिषदेत ग्रुप ग्रामपंचायत खांडपे सरपंच, गिता पब्लिक हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नमिता सुधाकर घारे यांच्या हस्ते अप्रगत मुलांचा दवाखाना या नाविण्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी शैक्षणिक विचार मंचावर केंदप्रमुख राजेंद्र आढाव, प्रमुख वक्ते निंबाजी गिते, साधन व्यक्ति मालू गायकवाड, माधवराव निकुंभ उपस्थित हाेते.

अध्ययनस्तर सद्यस्थिती पडताळणी करून खांडपे केंद्रात अक्षर स्तर व संख्या ज्ञान यावर प्रभावीपणे काम केले जाणार आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट अप्रगत मुलांना प्रगत करणे असे असून ही कल्पना राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक वेच्या गावित यांची आहे.

शिक्षण परिषदेत काेविड-19 नंतर शिक्षक म्हणून समृद्ध हाेतांना….या विषयावर निंबाजी गिते यांनी अतिशय उत्कृष्टपणे मार्गदर्शन केले. सरपंच नमिता घारे यांनी या वर्षापासून खांडपे केंद्रात एक आदर्श शाळा व आदर्श शिक्षक पुरस्कार देणार असल्याचे अप्रगत मुलांचा दवाखाना या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.

कर्जत तालुक्यातील अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा कर्जत या शिक्षकांच्या संघटनेने या उपक्रमास पाठिंबा दिल्याचे संघटनेचे कर्जत तालुका अध्यक्ष मनाेहर भाेसले यांनी सांगितले. अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र आढाव व सचिव अभिजित वाणी उपस्थित हाेते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.